मुखपृष्ठ

प्रिय वाचकवर्ग,

नमस्कार. आपले रुपयालॉजी मध्ये सहर्ष स्वागत आहे. रुपयालॉजी म्हणा किंवा डिजीटल रुपयालॉजी म्हणा दोन्ही सारखेचं आहेत. माझे ट्विटर, इंन्स्टाग्राम, फेसबुक किवा जो इतर कोणताही सोशल मिडिया प्लॅटफॉर्मस आहेत त्यावरील नाव हे डिजीटल रुपयालॉजी असेल. पण तुम्ही रुपयालॉजी ने पण शोधू शकता.

Rupayalogy Header Logo

प्रमुख मुद्दा पाहू आता. तर, मला माहिती आहे की तुमच्या मनात नक्की प्रश्न आहेत किंवा असतील की हे रुपयालॉजी नक्की आहे तरी काय? किंबहुना रुपयालॉजी सुरू तरी का केलं? सर्वप्रथम मी हे सांगू इछितो की की एक फ्री वेबसाईट आहे. तुमच्याकडून मी कोणतेही शुल्क आकारत नाहीये. ही वेबसाईट मी खरं तर खूप विचार करून बनवली आहे. विचार म्हणजे काय की कंटेंट चा, ना की ते वेबसाईट ला जे कोड्स असतात त्याचा.

तुम्ही नक्कीच विचार करत असाल. तुम्हीच काय, मी पण तोच विचार करतो की मला आयुष्यात एकाच इनकम किंवा एकाच उत्पन्नाच्या स्त्रोतावर अवलंबून रहायचे नाहीये. मला खूप सारे उत्पन्नाचे स्त्रोत निर्माण करायचे आहेत की जेणेकरून माझं आयुष्य किंवा माझ्यानंतर जे कोणी असतील त्यांच आयुष्य सुखकर बनवायचे आहेत. व्यवसाय का करावा, कशासाठी करावा, खरचं करावा की नाही का एक ट्राय मारून पाहतो जमला तर ठिक नाही तर नाही, व्यवसायाचे वेगवेगळे स्त्रोत कोणते या सगळ्यांवर प्रकाश टाकायचा असा या वेबसाईटमधून माझा मानस आहे.

मी आत्ता एका बॅंकेमध्ये नोकरी करतोय. आता सहाजिकच आहे तुम्हाला वाटणं की नोकरी करणारा कशाला आम्हाला शिकवतं आहे? कारण तो तर स्वतः नोकरी करत आहे, व्यवसाय नाही. तर मी आता तुम्हाला सांगू इछितो की मी भलेही स्वत: नोकरी करत आहे पण माझ्या साडेतीन वर्षाच्या कालखंडात मी साधारणपणे बॅंकेचे कस्टमर म्हणा किंवा बॅंकेबाहेरील असे सगळे मिळून ५०० पेक्षा अधिक व्यवसायांचा तसेच लोकांचा अभ्यास केला, त्यांचे ॲनालिसीस केले. आणि खरं सांगतो खूप काही शिकायला मिळाले. हे सगळं म्हटलं तुम्हाला पण समजावं, चार गोष्टी तुम्ही पण तुमच्या आयुष्यात नवीन सुरु कराव्यात असे मला मनापासून वाटते.

जास्तीकाही मागत नाहीये. फक्त येव्हढचं की आयुष्यामध्ये सारखं अपडेट राहणं खूप महत्त्वाचे आहे. म्हणून या वेबसाईट ला कनेक्टेड रहा म्हणजे तुम्हाला खूप नवीन गोष्टी शिकायला मिळतील.

टीप : – डिजीटल रुपयालॉजी ऊर्फ रुपयालॉजी कोणतीही “गेट क्विक रिच स्कीम” सांगत नाहीये किंवा त्यांना सपोर्ट / पाठपुरावा करत नाहीये. रुपायालॉजी चा उद्देश हा नॉलेज शेअर करणं हा आहे. सक्सेस ला कोणताही शॉर्टकट नाही. मेहनत ही घ्यावीच लागते.