Start a business

व्यवसाय का सुरू करावा?

व्यवसाय का सुरू करावा?, व्यवसाय खरचं सुरू करायचा का? पण मग मी करत आहे त्या नोकरीमध्ये काय वाईट आहे? माझ्या आजोबांनी, वडिलांनी नोकरी केली, वाडवडिलांनी नोकरी केली, तर मग मला व्यवसाय जमणार आहे का?

कदाचित असे खूप सारे प्रश्न तुमच्या मनात येत असतील. प्रश्न काय एक आला की त्याच्या पाठोपाठ दुसरा येतो. आणि पर्यायाने जन्म होतो भीती चा. भीती कसली की “मी यशस्वी झालो नाही तर काय?, मग व्यवसाय का सुरू करावा, कशाला” तर याच संदर्भात आज आपण थोडी चर्चा करूयात असे मला वाटते, म्हणून लिहीत आहे.

व्यवसाय का सुरू करावा याच्या कारणास्तव मी नोकरी वाईट आहे असं आजिबात म्हणत नाहीये, किंवा मी नोकरी करण्याच्या अगदी विरोधात पण नाहीये. पण कसं होतं ना नोकरीमध्ये तुम्ही दुसऱ्याच्या वेळेसाठी बांधिल असता.

म्हणजेच काय की तुम्ही तुमचा वेळ हा दुसऱ्याला पैसा मिळवून देण्यासाठी गुंतवता. तुम्हाला तर माहिती आहेचं की ‘टाईम ईज मनी’.

वेळ ही पैश्याइतकाच अमुल्य आहे. कारण एकदा गेलेले पैसे परत मिळू शकतात. पण एकदा हातातून निसटून गेलेली वेळ आपण परत मिळवू शकत नाही.

नोकरी करणे हे एक रेषीय समीकरण सोडविण्यासारखे आहे. थोडक्यात काय घोड्याला झापडे लावल्यावर घोडा कसं डावे उजवे न पाहता सरळ चालतो तसचं. नोकरीमध्ये मिळणारा पैसा हा माणसाला अपंग बनवितो.

आता तुम्ही म्हणाल की नोकरीतील पगाराचा आणि अपंगत्वाचा येथे काय संबंध? येथे अपंग म्हणजे काय कोणती शारीरीक व्याधी वाला अपंग नाही.

तर अपंग म्हणजे तुमची बुद्धी ही तुम्हाला आखून दिलेल्या चौकटीत काम करायला तयार होते. आता मला सांगा, हे पण एक प्रकारचे अपंगत्वच आहे ना?

जसे जसे तुम्ही नोकरी आरामदायी वाटायला लागते किंवा नोकरी करण्याची सवय लागते, तेंव्ह तुम्ही कंफर्ट झोन मधे जाता. कंफर्ट झोन मध्ये असाल तर तुमच्या प्रगतीवर पुर्णविराम लागतो.

नोकरीत असताना तुमच्याकडे एकचं उत्पन्नाचे साधन असते. आणि ते म्हणजे ९ ते ५ काम. जो कोणी विलन सारखा बॉस आहे त्याच्या शिव्या कानावर घेत, खाली मान घालून काम करणे.

आता मला सांगा, एक तुमच्या आमच्या सारखा सामान्य माणूस म्हटला तरी आपल्याला आपल्या रोजी रोटी साठी काय खर्च कमी नाहीत.

मेडीकल म्हणा, इंन्श्योरंस प्रीमियम, काही दुरूस्ती, आपले दर मासिक युटिलिटी बिल, आणि खूप काही. असे अगण्य खर्च करून आपल्या हातात फक्त चिल्लर उरतात. सुट्टी कधी मिळते आणि आपल्याला?

दर रविवारी किंवा काम असेल तर नाही. पण मला सांगा, आयुष्य हे काय फक्त रविवारीच जगायचं असतं होय? आता या सगळ्यात एखाद्याची नोकरी गेली तर मग बिचारा संपलाच.

आता थोडं आपण व्यवसायाचं बघूयात. व्यवसायात तुम्ही मन मर्जी चे मालक असता. व्यवसायात तुम्ही तुमचा वेळ हवा तसा वापरू शकता.

तिथे तुमचा कोणी बॉस नसतो, तर तुम्ही स्वतः बॉस असता. तुमचा शब्द हा सर्वतोपरी असतो.

व्यवसायात पहिल्या २-३ वर्षामध्ये आपल्या हाती काहीच लागत नाही. हवं तर म्हणा व्यवसाय तोट्यातपण चालतो असं आपण म्हटलं तर वावगे ठरणार नाही.

पण म्हणतात ना ‘हर रात के बाद सुबह होती हैं’, अगदी तसचं जो अवघड काळ आहे तो सरून गेल्यावर मग कुठे तुमचे उत्पन्न सुरू होते.

व्यवसाय सेटअप करावा याच्या स्टेप्स असलेला मला एक चांगला लेख सापडला. तर तुम्ही तो पहावा मला असे वाटते.

एकदा का व्यवसाय सुरू झाला ना की मग तेच पैसे आपण पुन्हा फिरवून नवीन व्यवसाय सुरू करू शकतो किंवा आहे तो व्यवसाय मोठा करू शकतो. आता जेथे स्वातंत्र्य आले तेथे सगळंकाही आलं.

पण एक गोष्ट आहे की तुम्हाला विश्रांती फार कमी मिळेल आणि धावपळ खूप असेल. माझं तर स्पष्ट म्हणणे आहे ज्याच्या अंगात मेहनत आणि स्मार्ट वर्क करायची जिगर असेल त्यानेच व्यवसायरूपी समुद्रात उडी मारावी.

आता या सर्वांवरून तुम्हाला ठरवायचे आहे की तुम्हाला स्वतःच्या स्वप्नांसाठी झटायचे आहे की दुसऱ्याची स्वप्न पुर्ण करून देण्यात धन्यता मानायची आहे. बघा ! नीट विचार करा, नोकरी करणार की व्यवसाय?

जर आता तुम्हाला व्यवसाय का सुरू करावा या प्रश्नाचे उत्तर मिळाले असेल, तर मी तुम्हाला हे सांगू इछितो की या एकविसाव्या शतकात व्यवसायाला वेबसाईट ची जोड हवी.

तर तुम्ही आमची वेबसाईट म्हणजे काय ही पोस्ट वाचली का? जर वाचली नसेल तर जरूर वाचा. आणि काही शंका असल्यास आम्हाला जरूर संपर्क करा.

2 comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *