तुमच्या कानावर आले असेलच की लोकं वेबसाईटद्वारे पैसे कमावतात, ते पण आपल्या भारतीय चलनात नाही तर जगभरातील वेगवेगळ्या चलनांमध्ये थोडक्यात परकीय चलनांमध्ये.
लेख सुरू करण्यापूर्वी आपण प्रथम जाणून घेऊ की वेबसाईट म्हणजे नक्की काय असते?
वेबसाईट म्हणजे सरळभाषेत सांगायचं झालं म्हणजे वेगवेगळी डिजीटल पेजेस जी एका होस्टींग अकाऊंट वर स्टोअर असतात व तेथून ती एका डोमेनद्वारे संपूर्ण जगासाठी खूली होतात.
आता तुम्ही म्हणाल की, नचिकेत, डोमेन आणि होस्टींग नक्की काय असतात आणि ते एकमेकांना कसे एकत्रित जोडले गेले असतात?
तर डोमेन म्हणजे एक नाव म्हणून पहा. आता जसं माझं नाव नचिकेत आहे, तसचं प्रत्येक वेबसाईटचे एक स्वतंत्र नाव असते. आता तुम्ही जो लेख वाचत आहात तो https://rupayalogy.com/ या ब्लॉग वा वेबसाईटवर वाचत आहात. म्हणजे https://rupayalogy.com/ हे झाले या वेबसाईट चे नाव.
आता होस्टींग काय असतं ते पाहू. जसा तुमचा पेनड्राईव्ह तुमचा डेटा डिजीटली स्टोअर करतो तसेच वेबसाईट चा डेटा हा वर्चूअली स्टोअर करावा लागतो.
त्यासाठी जी आपण स्पेस विकत घेतो त्याला होस्टींग (अकाऊंट) असे म्हणतात. डोमेन नेम आणि होस्टींग एकमेकांना एका नेम सर्व्हरद्वारे जोडले गेले असतात.
पण आता तुम्हाला प्रश्न पडेल की माझं होस्टींग अकाऊंट वेगळ्या कंपनीकडे आहे आणि डोमेन वेगळ्या कंपनीकडे आहे तर मग ते एकमेकांना कसे जोडले जातीत? त्यासाठी काय वेगळे नेम सर्व्हर घ्यावे लागतील का? तर याचे उत्तर “नाही” असं आहे.
तुम्हाला तुमच्या होस्टींग कंपनीचे नेम सर्व्हर्स हे डोमेन नेम कंपनीला कॉपी पेस्ट करून जोडायचे असतात. नेम सर्व्हर हे जोडल्यानंतर चोवीस तासाच्या आत ॲक्टीव होतात आणि तुमची वेबसाईट लाईव्ह होते.
तर तुम्हाला आत्तापर्यंत समजले असेल की एक वेबसाईट बनविणे केव्हढे सोपे आहे. पण हेच सगळ समजून घ्यायला मला २०१९ मध्ये भयंकर नाकीनऊ आले होते.
आता आपण पाहू वेबसाईटद्वारे कसे पैसे कमाविता येतात. मुळात सांगायचे झाले तर वेबसाईट ह्या तीन प्रकारच्या असतात :
०१. पोर्टफोलियो वेबसाईट
०२. ब्लॉग
०३. ई-कॉमर्स वेबसाईट
आता पोर्टफोलीयो वेबसाईट म्हणजे स्वतःची खाजगी वेबसाईट किंवा कंपनीची वेबसाईट येते. यात तुम्ही तुमचे जे काही कोर्सेस असतील किंवा जे काय तुमच्या सर्विसेस असतील त्या लघू प्रमाणात विकू शकता.
त्याचे सर्वोत्तम उदाहरण म्हणजे वर्डप्रेस आणि वू-कॉमर्स प्लगीन चे कॉंबिनेशन.
दुसरा प्रकार म्हणजे ब्लॉग. आता तुम्ही https://rupayalogy.com/ वर जे काही वाचत आहात ते ब्लॉगच्या आत येते. पण आता तुम्ही म्हणाल की ब्लॉग वर कसं कमाविता येणार?
तर तुम्ही ब्लॉगवर दोन प्रकारे कमावू शकता एक म्हणजे गूगल ॲडसेंस किंवा त्यासारखे वेबसाईटवर ॲड्स देणाऱ्या कंपन्या.
आणि दुसरा मार्ग म्हणजे वर सांगितला तो. तुमचे प्रोडक्ट आणि सर्व्हिसेस विकून पैसे कमाविता येतात.
एक गोष्ट लक्षात असूद्या की वरील दोन्हीपैकी एकचं गोष्ट करता येते. कारण ॲड्स देणाऱ्या कंपनीच्या पॉलीसीमध्ये ये बसत नाही.
तिसरा मार्ग म्हणजे ई-कॉमर्स वेबसाईट. तुम्हाला तर https://www.flipkart.com/ आणि https://www.amazon.in/ या दोन बलाढ्य कंपन्या माहीती असतीलच.
जसं पोर्टफोलीयो वेबसाईट प्रकारात आपण लघू स्वरूपात विक्री करू शकतो तसेच येथे मोठ्या प्रमाणावर विक्री करता येते.
तर हे प्रमुख तीन प्रकार आहेत की ज्यामधून तुम्ही चांगला रेव्हेन्यू जनरेट करू शकता. पण हे सगळे करत असताना तुम्ही दुसऱ्या कोणाच्या वेबसाईट चा कंटेंट हा त्यांच्या लेखी परवानगीविना वापरत नाही आहात ना याची काळजी घ्या.
तुमच्या वेबसाईटच्या योग्य त्या प्राईव्हसी पॉलीसीज आखून घ्या आणि त्याच्या आतच काम करा. जर तुम्हाला काही समजले नसेल किंवा काही विचारायचे असल्यास तुम्ही मला संपर्क मधून माझ्याबरोबर संवाद साधू शकता.