How to do business planning

व्यवसाय योजना काय आहे? आणि व्यवसाय योजना कशी बनवली जाते?

व्यवसाय करायची बऱ्याच जणांना ईच्छा असते. त्यांचे “व्यवसाय हेचं माझं पॅशन” हे ब्रीदवाक्य ठरलेले असते. पण तुम्हाला वाटते का की व्यवसाय करणे येव्हढे सोपं आहे? त्यासाठी काही योजना अर्थात प्लॅनिंग करावे लागतात. तर त्या प्लॅनिंग बद्दलचं आज आपण या लेखात बोलणार आहोत.

व्यवसाय योजनेला इंग्लिशमध्ये बिझनेस प्लॅनिंग असे म्हणतात. आता हे तर तुम्हाला आधीच माहिती आहे. पण मग परत मी सगळं हेचं का सांगतोय हा प्रश्न पडत असेल. आज नेमकं मी मार्केटमध्ये फिरत असताना काही गोष्टी निदर्शनास आल्या म्हणून म्हटले की जरा आज बोलावे या विषयावर. तसही खूप दिवसात काहीचं लिहिले गेले नाहीये.

बिझनेस प्लॅनिंग ला आपण स्ट्रेटेजीक प्लॅनिंग पण म्हणू शकतो. कारण आता बघा ना, मूलतः जर तुम्ही कोणत्या कंपनीचे BPM म्हणजेच Business Planning Module जर पाहीले असेल तर, ते एक सॉफ्ट कव्हर असलेले ३० ते ५० पानांचे एक मोठे पुस्तक असतें, ज्यात त्या कंपनीबद्द्ल माहिती असते. म्हणजे कंपनीची उद्दिष्ट, कंपनीला पुढे जाण्यासाठी मिळणारी प्रेरणा, कंपनीला सतत पुढे का जायला हवं ही कारणे म्हणजेच परपज किंवा मोटीव्हेशन, कंपनीचे फाईनांशल्स, भविष्यात घेतल्या जाणाऱ्या जोखिमा, मार्गदर्शन तत्वे इत्यादी.

जर आता तुम्हाला व्यवसायाची योजना आखायची असेल किंवा बिझनेस चे स्ट्रॅटेजीक प्लॅनिंग करायचे असेल तर तुम्ही ती कशी कराल? तर सोपं आहे. तुम्हाला अगदी मूलतः पातळी पासून म्हणजेच बेसिक लेव्हल पासून सुरू करायचे आहे.

सर्वात प्रथम, मी तुम्हाला हे सांगू इछितो की व्यवसायाचे ४ खांब आहेत, ज्याची मदत तुम्हाला व्यवसायाच्या योजना बनविण्यात होते.

पहीला : तुम्हाला व्यवसाय करण्यात खरचं रस आहे का? कारण कसं आहे ना की जर तुम्हाला रस नाहीये आणि समोरचा करत आहे, ते बघून चला मी पण करतो, अशी जर परिस्थिती असेल तर तुमचा व्यवसाय २ ते ३ महीन्यात संपेल.

दुसरा : तुमच्याकडे व्यवसाय सुरू करण्यासाठी भांडवल आहे का आणि किती आहे? भांडवल म्हणजेच कॅपिटल. व्यवसायातील अतिशय महत्त्वाचा घटक. जर तो नसेल तर व्यवस्थापन सुरूच होऊ शकत नाही. जर तुमच्याकडे आता व्यवसायात गुंतविण्यासाठी पैसे नसतील तर तुम्हाला त्यासाठी  हालचाल करावी लागेल. म्हणजेच तुम्हाला बॅंकेकडून कर्ज काढावे लागेल.

तिसरा : व्यवसायातील खर्च. आपल्या व्यवसायात होणाऱ्या प्रत्येक खर्चावर आपले बारकाईने लक्ष हवे. जर एखादा खर्च होत असेल तर पर्यायाने आपण तो कसा कमी करू शकतो वा थांबवू शकतो या वर भर दिला गेला पाहीजे.

चवथा आणि शेवटचा मुद्दा म्हणजे माणसे. माणसे ही एकदम विश्वासातली हवीत. मला माहीत आहे की हे काय एका रात्रीत समजणे शक्य नाही कारण हे अनुभवातून शिकायला मिळते.

बिझनेस प्लॅनिंगमध्ये व्यवसाय कसा वाढेल यावर भर असतो. पण मग ते सगळं करताना व्यवसायिकाला खूप गोष्टी ध्यानात ठेवाव्या लागतात. उदाहरण द्यायचे झाले तर, आपण आत्ता कंपनीच्या खर्चाबाबत बोलू शकतो. आता खर्च म्हणलात की भल्या भल्यांच्या पोटात गोळा येतो. कदाचित “आता खिश्याला मोठा खड्डा पडणार” अशी वाक्येपण कानावर येत असतील.

पण खरं सांगतो, खर्च नियंत्रित करणे ही माझ्या दृष्टीने एक कला आहे. कारण जर तुम्ही खर्चांवर नियंत्रण मिळविले म्हणजे तुम्ही अर्धे व्यावसायिक जग जिंकल्यासारखेच आहे. खर्च कमी झाला म्हणजे तुमचा नफा वाढला. पर्यायाने तुमची देणीपण कमी झाली.

पण फक्त खर्च मर्यादित करून चालणार नाही. तर तुम्हाला विक्री पण करता आली पाहीजे. आता बघा ना, जर तुम्ही फक्त खर्च एकदम कमी केला पण तुमच्या व्यवसायाची विक्री काहीच नाहीये; असं कसं चालेल ना? विक्री करण्यासाठी त्याचे ऑनलाईन तसेच ऑफलाइन मार्केटिंग पण केले गेले पाहीजे.

इंव्हेसमेंटबद्द्ल तुम्हाला काय वाटतंय? व्यवसायाची गुंतवणूक कशी हवी? बरोबर केलेलीए गुंतवणूक ही एक पायरी व्यवसायाला खूप मोठं करू शकते. कारण कसं होतं ना, गुंतवणूक केली की त्यावर रीटर्न मिळतात ते पुढे तुम्ही व्यवसायासाठी, व्यवसाय वाढीसाठी वापरू शकता.

आता तुम्हाला समजलं असेलचं की व्यवसायासाठी योजना करतात ती काय असते. व्यवसाय योजना हा खरं म्हटलं तर खूप मोठा विषय आहे. तुम्हाला काय वाटते बिझनेस प्लॅनिंगबद्दल? मला कमेंट्समध्ये जरूर कळवा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *