Job or business in marathi

कोणताही अनुभव नसताना व्यवसाय सुरु करताय?

कोणताही व्यवसाय हा अनुभव नसताना सुरू करणे हा जेव्हढ्या धाडसाचा विचार आहे तितकाच मूर्खपणाचा पण विचार आहे असे मी म्हणेल.

कारण, हल्ली YouTube पाहून प्रत्येक जण हा व्यवसाय करायचा विचार करतो. आता बघाना परवाच एक Video पहात होतो YouTube वर.

तर त्या Video चा Host एका विमानाबद्द्ल चा व्यवसाय सांगत होता. आता त्याच्या सांगण्याची पद्धत एव्हढी चांगली होती की क्षणभर मला पण वाटले की चला आपलं सगळं सोडून देऊ आणि तो व्यवसाय सुरू करू.

पण कसं असतं ना, मला त्या गोष्टीचा अनुभव नाहीये. मी पैसे त्या व्यवसायात invest करणार आणि तोंडावर आपटणार. तसचं आत्ता सद्ध्याला खूप लोकांचे होत आहे.

बिना experience घुसणारे बरेच लोक वाढले आहेत. क्षणिक प्रेरणेने, ऊत्साहाच्या भरात लोकं त्यांचा पैसा व्यवसायाला लावतात आणि नंतर त्यांच्यावर रडायची पाळी येते. आता असे न झेपणारे व्यवसाय fail होण्याचे दोनच कारणे आहेत.

एक म्हणजे ‘Over Confidence’, “चला. आता मला जमलेलं आहे. मी व्यवसायात पडलो म्हणजे successful झालोच”, असा झालेला गैरसमज. आणि दुसरे म्हणजे, “मला सगळं येत आहे. मला नवीन काही शिकायची गरज नाही”.

आणि चला पटलं मला की तुम्ही नवीन व्यवसाय शिकायला पण सुरू केलात.

पण त्यातील Consistancy पाळलीत का? व्यवसायातली आणि शिकण्यातली? याची ऊत्त्तरे ही “नाही” अशी असतात.

समजा आता तरीपण या अश्या व्यवसायात एखाद्याला पडायचच म्हटले तर सर्वप्रथम हा असा व्यवसाय कोण कोण करत आहेत त्यांचे मार्गदर्शन घ्या.

I know, कधी कधी अश्या लोकांना personally भेटणं खूपच कठीण असतं तर मग अश्यावेळेस YouTube, Udemy सारखे sources आहेत. ते follow करा. पण मार्गदर्शन घ्या. अन्यथा सुरवातीलाच मूठभर माती खायची वेळ येते.

या सगळ्यात खूप पळापळ करावी लागते. आता तुम्ही म्हणाल की नचिकेत, यात आता अजून काय पळापळ असणार. Youtube channels ला follow केला म्हणजे झालचं की.

पण मला सांगायला अतिशय वाईट वाटत आहे की यातून पण काही outcome निघणार नाही. कारण, तुम्ही तुमचा स्वतःचा Homework कुठे केला आहे.

नुसतं videos पाहीले म्हणजे झालं असं मुळीच नसतं. ते सगळं तुम्हाला समजून घेऊन, त्यावर वेळ घालवून जर त्याचं पुढे काही implementation तर मग त्याला काही अर्थ आहे.

तुम्हाला स्वतःचे स्वोट (SWOT) विश्लेषण करता आले पाहीजे. आपले कुठे चूकत आहे आणि आपण ती चूक कशी सुधारू शकतो हे जेंव्हा आपल्याला समजते ना, तेंव्हा कुठे म्हणायचे की आपण आपल्या ध्येयाचा अर्धा भाग पुर्ण केला.

आणि आता शेवटचे पर्व म्हणजे नवीन गोष्टी शिकणे आणि consistantly update राहणे. ह्या गोष्टी जर केल्या तर तुम्ही कोणताही नवीन व्यवसाय सूरू करू शकता.

आता जर एक श्लोकी रामायण सांगायचे झाले तर, चूकांमधूनच माणूस शिकतो. पण याचा अर्थ एकच चूक सारखी करू नका.

नवीन चूका करा, म्हणजे शिकायला पण खूप मिळते. तुमच्या ध्येयाच्या related सतत काही नवीन शिकत रहा. स्वतःला update ठेवा.

गरज भासल्यास एखाद्याने ती गोष्ट केली आहे अश्याचे मार्गदर्शन घ्या. त्यात लाज नको. स्वतःचा SWOT Analysis करा.

काय चूकतं आहे ते सुधारा. ज्या तुमच्या strength वाढवून नवीन संधी निर्माण करा. मनात कायम विश्वास असू द्या की तुम्ही ते करू शकता. आणि दररोज एक एक पाऊल पुढे सरकत रहा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *