Greed and Luxury in marathi

फक्त हाव च पुरेशी आहे.

लेखाचे शीर्षक वाचून तुम्ही कदाचित बुचकळ्यात पडला असाल की व्यवसायासाठी हाव करावी का? हाव केली तर मला जे मिळत नसतं ते ओरबाडून मिळविता येईल. पण तुमचा गैरसमज होणं स्वाभाविकच आहे जरा.

पण मी काय म्हणतोय की फक्त हाव पुरी आहे, पण कशासाठी, तुमचा व्यवसाय डुबवायला. भूतो न भविष्यति, हाव की ना कधी चांगली आहे, ना कधी चांगली राहणार आहे.

हाव केली तर तुमचे नेहमी नुकसानच होते. आणि नुकसान म्हणजे काय साधेसुधे नाही. तर मोठे नुकसान करवायची capacity आहे या हव्यासामध्ये.

मी माझीच गोष्ट सांगतो ह्या हव्यासाबद्द्लची. मी एका छोट्या बॅंकेमध्ये काम करतो. माझं जॉईनिंग हे ऑगस्ट ०३, २०१७ च आहे त्या बॅंकमध्ये.

तर तेंव्हा मला पगार मासिक पगार होता रुपये ११,०००/- (अक्षरी अकरा हजार रुपये फक्त) आणि सगळी कपात वगैरे करून हातात रुपये ९,४७९/- (अक्षरी नऊ हजार चारशे एकोणऐंशी फक्त) यायचा.

तर तेंव्हा मी म्हटलं की चला थोडा का होईना, आपल्याला मिळणारा पगार हा कुठेतरी चांगल्या ठिकाणी गुंतवूया. म्हणून मी एक डिमॅट अकाऊंट आणि ट्रेडिंग अकाऊंट उघडले.

तेंव्हा काय शेअर मार्केटमध्ये पूर्ण नवखा. म्हणजे कोणीही सांगितलं की हा शेअर चांगला, तो शेअर चांगला की लगेचच ते शेअर घेणारा.

थोडक्यात शेअर मार्केटचे knowledge नसल्याने कोणीपण मूर्ख बनवू शकेल असा. तर मी कोणा एकाच्या सांगण्यावरून पेनी स्टॉक्स खरेदी करायला सुरू केले.

पेनी स्टॉक्स म्हणजे आता तुम्ही जर मार्केट पाहीले असेल तर काही शेअर्स दिसतात ना ० ते १-२ रुपायांच्या पट्टीतले, ज्यांचा भविष्यात काडीमात्र वाढ आणि उपयोग नसतो असे शेअर्स.

मी पैसे लावतानाच माझ्यामते जवळ जवळ रुपये ३,०००/- लावले असतील. आता तीन हजार का चार हजार ते नीटसे आठवत नाहीये पण रक्कम तरी अश्याच पट्टीतली आहे.

आता हे तीन हजार म्हणजे माझ्या हातात येणाऱ्या पगारापैकी ३१.६५% पैसे मी त्या पेनी स्टॉक्स वर लावले. नंतर काही काळ गेल्यावर ते शेअर्स का वाढत नाहीयेत हे समजेना.

म्हणून मी शेअर मार्केटचा अभ्यास सुरू केला. मग मला हळूहळू समजलं की मी फार घाण आणि पोतंभरून माती खाल्ली आहे.

कारण माझ्यासाठी ते ३१.६५% हे खूप मोठे होते. होते काय, अजूनही आहेत. काही दिवसांनी त्या पेनी स्टॉक्स मधील काही शेअर्स ची किंमत एक रुपायाने वाढली.

मी विचार केला की चला आता एक रुपायाने किंमत वाढली म्हणजे अजून पुढे भविष्यात वाढेल म्हणून मी अजून रुपये ३,०००/- त्या शेअर्ससाठी लावले.

म्हणजे साधारणपणे मी माझ्या हातात येण्याऱ्या पगारापैकी ६३.३०% पगार तिकडे लावला. झालं काय त्यातील जास्तीहून कंपनी बंद पडल्या. माझे सगळेच पैसे गेले.

आता दुसरं उदाहरण देतो, मागील वर्षीच झाले होते हे. मला आता self study मुळे शेअर मार्केटचे हळूहळू knowledge यायला लागले.

पगारपण वाढला होता, म्हटलं आता थोड्या चांगल्या शेअर्स वर पैसे लाऊ. म्हणून मी माझ्या शेअर ब्रोकर ला फोन केला आणि विचारलं की कोणते शेअर्स इंट्रा-डे साठी घेऊ.

तर तिने सांगितल्याप्रमाणे मी ते शेअर्स घेतले. मी माझं डोकं लावलं नाही आणि आधीसारखंच दुसऱ्याच्या भरवशावर बसलो.

इंट्रा-डे ला कसं असतं की एखादा शेअर हा high price ला sell करायचा आणि lower price ला buy करायचा (short sell).

मी पण शेअर higher price ला sell केला आणि वाट बघत बसलो की lower price ला कधी येईल ते. पण तो शेअर अजून अजून वर चढायला लागला.

मग ब्रोकर ला फोन केला आणि घडणारी परीस्थिती सांगितली. तिने मग अजून काही शेअर घेऊन आणि विकून मला माझे गुंतवलेले पैसे परत मिळवून दिले.

पण काय आहे ना तिथेच वाटले की जर गमाविलेले पैसे रीकव्हर होऊ शकतात तर पुन्हा गुंतवायला काय हरकत आहे. म्हणून मी पुन्हा पैसे लावले.

पण या दुसऱ्या वेळेस मला रुपये ५,८७९/- जवळजवळ रुपये ६,००० गमवावे लागले. दोन्ही वेळेस पैसे गमाविण्यास माझी हावच पुरेशी पडली.

थोडक्यात एक श्लोकी रामायण सांगायचे झालं तर, हाव करणं खरचं खूप नुकसानकारक आहे.

हव्यासापोटी लावलेले पैसे हमखास बुडतात. जर हव्यासच करायची असेल तर कालचे तुम्ही आणि भविष्यातले तुम्ही यासाठी करा.

आपला उद्याचा दिवस हा आपण कसा चांगला बनवू शकतो याची हव्यास बाळगा. जिथे पैशाचा प्रश्न असतो तिथे तुमचे इमोशंस ताब्यात ठेवा.

कारण बिहेवियर वर पण पैसा अवलंबून आहे. (जर तुम्ही सायकॉलॉजी ऑफ मनी हे पुस्तक वाचलं असेल तर तुम्हाला बिहेवियरबद्दलचे फार चांगले समजू शकेल.)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *