December 5, 2022
Is show off necessary

दिखाऊपणा खरचं करावा का?

आत्ताचा काळ हा दिखाऊपणाचा आहे. म्हणजे तुम्ही मनाने कसे आहात, तुमचं कुटुंब कसं आहे यापेक्षा तुम्ही किती कमाविता याच्याकडे लोकांच जास्त लक्ष असतं.

मग भलेही तो व्यक्ती कितीही वाईट किंवा व्यसनाधीन असो. तो पैसे किती उडवितो हे पाहीले जाते. खरंतर हे चूकीचे आहे. एखादा पैसे कमाविण्यासाठी किती धडपड करतोय हे लोकं पाहणं दुर्लक्षित करतात.

पण एकदा का पैसा आला की मग, “अरे भाई कसा आहेस, खूप दिवसात भेटला नाहीस, ओळख ठेवत जा” वगैरे गोष्टी कानावर येतात.

आत्ताच्या काळात सगळेच Instagram वर आहेत आणि असतील याची मला खात्री आहे. Instagram वर दिसणाऱ्या ‘सगळ्याच’ छानछौकी ह्या खऱ्या नसतात.

एखाद्याची Instagram वर दिसणारी Lavish Lifestyle ही खरी असू ही शकते किंवा नसू ही शकते. तुम्ही कसे Prove करणार ना ते? सहाजिकच आहे.

आता समजा उद्या जाऊन मला पण Instagram वर एक माझी Lavish Lifestyle आहे हे दाखवायचं आहे.

तर Basically मी एक महागडी गाडी आठवड्याच्या भाड्याने घेईन. एक छोटा Villa भाड्याने घेईन. त्यात बसून YouTube Videos बनवेन की माझ्या कडून शिकून तुम्ही कसे माझासारखे श्रीमंत बनू शकता, बघा मी सूट बूट मध्ये फिरतोय, बघा मी कसं मोठ्या आणि महागड्या गाडीमध्ये फिरत आहे, बघा माझं कसं मोठं घर आहे.

तर आता हे सगळे Videos बनवून मी YouTube वर Upload करेन. थोडे Facebook Marketing आणि Google Ads चालवून लोकांपर्यंत पोचवेन.

माझ्या Videos चे Views वाढतील. माझे Subscribers वाढतील. आणि समजा, आता YouTube वर अश्या कित्तेक Fake Gurus चे Videos आहेत, जे तुम्हालापण माहिती आहेत आणि मला पण.

पण मला सांगा आता ही सगळी Fake Lifestyle दाखविली तरी मी खरा होतचं नाही ना. मी फक्त समोरच्याला मुर्ख बनवून त्यांच्याकडून पैसे लुबाडत आहे.

जर असा Show Off करायचाच असेल ना तर मग जेंव्हा तुम्ही गोष्ट Achieve करताना च struggle टाका किंवा ती गोष्ट Achieve केल्यानंतर टाका जेणे करून तुम्ही खरचं ती गोष्ट मिळविली आहे हे सिद्ध होते.

चार लोकं तुमच्याकडून प्रेरणा घेऊन त्यांच्या आयुष्यात बदल घडवून आणू शकतील.

आता या सगळ्या रामायण – महाभारताचे एका श्लोकात सगळे सांगतो.

दिखाऊपणा करणं खरं कधीही चांगले नाही. पण तुम्हाला दिखाऊपणा करायचाच आहे, तर मग स्वतः सगळं शून्यातून निर्माण करा आणि त्याच्यावर माज करा.

जर दिखाऊपणासाठी गोष्टी भाड्याने घेऊन माज केला तर तो जास्तकाळ टिकत नाही. म्हणतात ना,”हवं असलेल्या गोष्टी विकायची पाळी केव्हा येते जेंव्हा नको असलेले विकत घ्यायची सवय लागते.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Share via
Copy link
Powered by Social Snap