मोबाईल चा योग्य वापर करून बिझनेस वाढवा
आजची पिढी मोबाईलच्या भयंकर अश्या सापळ्यात अडकली आहे असे आपल्याला म्हणता येईल. कितीही झाले, कसेही झाले तरी नव्या तंत्रज्ञानाचे युग आहे सद्ध्याचे, मोबाईल चे युग म्हणा हवं तर..
मुलांसोबतच अगदी पालकही मोबाईलच्या आहारी गेलेले दिसतात आणि आहेत. तरुणाई दिवस-रात्र गेमिंग उदाहरणार्थ पबजी, सोशल नेटवर्किंग साईट्स उदाहरणार्थ फेसबुक, ट्विटर, वेब सिरीज सारख्या गोष्टींच्या पाठी असतात..
हा नक्कीच मोबाईल फोनचा गैरवापर ठरू शकतो आणि तो आहेच. मोबाईल फोन फक्त आणि फक्त करमणूक म्हणून वापरणे ही सर्वात मोठी चूक आहे किंवा म्हणा घोडचूक आहे.
जे बिझनेसमन आहेत म्हणजेच व्यावसायिक, त्यांच्यासाठी तर हा मोबाईल म्हणजे त्यांच्या कामाचे साधन आहे, ज्यामुळे त्यांची कामे अगदी पटापट होतात.
हे विचार ज्यांना समजले आहेत तेच मोबाईलचा योग्य पध्दतीने वापर करत आहेत असे म्हंटले तरीही चालू शकेल.
अगदी खरं सांगतो, अनेक जण आपला बिझनेस वाढवण्यासाठी विविध मार्गांचा अवलंब करताना दिसतात, वेगवेगळे व्यवसाय ट्राय करताना दिसतात.
पण आपल्या हातात असणाऱ्या मोबाईलकडे एक मार्ग किंवा उत्पन्नाचा एक स्त्रोत्र म्हणून कोणीही बघण्यास तयार नाही. किंबहुना त्यांना ते पटतही नाही.
मोबाईल म्हणजे फक्त एक मनोरंजनाचे उपलब्ध असे साधन आहे असेच अनेकांची समजून असते. पण या मोबाईलचा हा अतिशय योग्य पध्दतीने वापर करून तुम्ही तुमचा बिझनेस सुद्धा मोठ्या प्रमाणावर वाढवू शकता.
यासाठी तुम्हाला काही गोष्टी ह्या पूर्णपणे कराव्या लागतील आणि सोबतच काही गोष्टी करणे १००% टाळावे लागेल. चला तर मग त्या गोष्टी कोणत्या ते आपण पाहूया.
या गोष्टी सुरू करा.
१) गुंतवणुकीबद्दल शिकून घ्या उदाहरण द्यायचे झालेचं तर स्टॉक, शेअर्स, म्युचुअल फंड इत्यादी. मोबाईल हे साधन गुंतवणूक शिकून घेण्यासाठी अतिशय उपयुक्त आहे कारण तुम्हाला येथे सगळी माहिती अगदी सहजपणे सापडते.
आज इंटरनेटवर गुंतवणूक कशी करावी, का करावी, कोठे करावी इत्यादी इत्यादी ची सगळी माहिती उपलब्ध असते ते ही अगदी मोफत.
तेव्हा याचा वापर करून गुंतवणुकीबद्दल जास्तीत जास्त शिकून घ्यावे. भविष्यात याचा नक्कीच फायदा होईल, कारण आपल्या जवळ असलेलं नॉलेज कधीच वाया जात नाही.
२) अजून एक पध्दत अशी की, तुम्ही मोबाईल मार्फत तुमचा बिझनेस सुरु करू शकता.
तुमच्या उत्पादनांबद्दल लोकांना माहिती ही फेसबुक, इंस्टाग्राम या मधून देऊन तुमची उत्पादने त्यांना विकू शकता. मोबाईल हे साधन डिजीटल मार्केटिंग वर काम करण्यासाठी अत्यंत सोयीस्कर आणि फायदेशीर ठरेल.
३) मोबाईल मार्फत सोशल मीडियाचा वापर करून तेथे आपल्या उत्पादनासाठी ऑनलाईन इंस्टामोजो, रोझरोपे वर शॉप किंवा वेबपेज, वेबसाईट तयार करणे हा आताच्या विक्रेत्यांचा नवा फंडा आहे.
असे केल्यास ऑनलाईन किंवा डिजीटल मार्केटिंग सुद्धा होते आणि ऑनलाईन असणारे ग्राहक सुद्धा आपल्याला मिळतात.
४) जे सर्वात अवघड काम वाटते ते, मोबाईल फोनचा वापर करून आपल्याला आपल्या ग्राहकांना जोडता येते.
योग्य सेवा आणि वस्तू पुरवण्यासोबतच त्यांच्याशी योग्य संवाद, फॉलोअप ठेवून आणि त्यांच्या समस्या जाणून घेतल्यास व सोडविल्यास ग्राहक हा अधिक संतुष्ट होतात. त्यामुळे असे कौशल्य सुद्धा आपल्याला मोबाईल फोन मधून अगदी मोफतपणे शिकता येईल.
या गोष्टी करू नका.
१) मोबाईल फोन हातात घेऊन तो फक्त मनोरंजनासाठी किंवा टाईमपास साठी वापरणे बंद करा कारण तुमचा पैसा आणि वेळ हे दोन्ही महत्त्वाचे घटक खर्च होतात..
२) तरुणांना वेबसिरीज, मूव्हीज तर अगदी लहानांना सुद्धा गेमिंग ने वेड लावले आहे जे की खरं चूकीचे आहे.
हे सर्व कमीतकमी वेळेसाठी वापरा जेणे करून वेळ सत्कर्मी लावता येईल. मोबाईलचा वापर नवनवे रिसर्च, नवीन काही समजून घेणे आणि त्याचा अभ्यास यासाठी करा.
३) फक्त अमुक-तमुक लोकांना फॉलो करत राहणे जे खरं निरर्थक असते, फोटो अपलोड करणे, अगदी दहा दहा वेळा नोटिफिकेशन चेक करणे यापेक्षा व्यवसाय करू इच्छिणाऱ्या लोकांनी फ्री टूल्स उपलब्ध आहेत त्यांच्या मार्गे मार्केट रिसर्च, नवनवीन स्पर्धक उत्पादनांची माहिती, सर्व्हिसची माहिती मिळवण्यासाठी मोबाईलचा वापर करणे सुरु करा की जेणे करून भविष्यात फायदा होईल.
४) वारंवार सोशल मीडियाचा वापर टाईमपास साठी न करता काही बिझनेस रिलेटेड न्यूझ, बिझनेस मॅगझिन वाचण्यासाठी करावा. इंटरनेटवर भरपूर काही शिकण्यासारखे आहे. आणि मोबाईल हे साधन इंटरनेटच्या वापरासाठी प्रतीकूल नाही. त्यामुळे त्याचा योग्य वापर करा.