Academic Education in marathi

फक्त शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण सध्याच्या युगात पुरेसं नाही.

बऱ्याच जणांनी मानसिकता फक्त शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाले की एका नोकरीच्या शोधात राहणे आणि मग आयुष्यभर ती नोकरी करणे एवढीच असते, पण सध्याच्या काळात जे शाळेत आणि कॉलेज मध्ये शिकवलं जातं ते कितपत अपडेटेड आहे?

बऱ्याच गोष्टी तर अशा असतात ज्या आताच्या जगात शिकून त्याचा आयुष्यात काहीच उपयोग होत नाही, फक्त अभ्यास करून, रट्टा मारून पास होण्याइतकच आपलं ध्येय असत आणि ते आपण साध्य करतो सुद्धा, एखादी डिग्री मिळाली की आपल्याला सर्व काही जिंकल्यासारखं वाटत.

पण तीच डिग्री घेऊन बाहेर नोकरीच्या शोधात निघालं की आपल्याला समजत की आपण जे शिकलो त्याची तर मार्केट मध्ये गरजच नाहीय आणि त्यासाठी आम्ही हजारो लाखो रुपये कॉलेज ची फी भरली होती, किंवा कंपन्यांना ज्या तंत्रज्ञानाची गरज आहे ज्या स्कील्स ची गरज आहे ते तर आम्हाला शिकवलंच नाही आणि आपल्याला याच कारणांमुळे नोकरी मिळत नाही, आज बरेच इंजिनिअर किंवा वेगवेगळ्या फील्ड मध्ये विद्यार्थी नोकरीअभावी घरी बसलेत.

शाळा कॉलेजमधील शिक्षण गरजेचं आहेच पण त्याच सोबत Self Education, Skills शिकणे हे सुद्धा तितकेच गरजेचे आहे, तुमच्याकडे जर इतरांपेक्षा काही वेगळे स्किल असेल तर तुम्हाला नोकरी मिळवताना किंवा बिझनेस करत असाल तर Client मिळवताना सोपं जातं.

स्किल्स शिकायचे कुठून ?

तुम्हाला आवडतील त्या क्षेत्रातील कोर्सेस, क्लासेस तुम्ही जॉईन करू शकता, नवनवीन गोष्टी, Self Education साठी सर्वात सोपा प्लॅटफॉर्म म्हणजे गुगल, युट्युब वरून माहिती मिळवणे, ब्लॉग्स, ईबुक वाचणे, सेमिनार ला जाणे व्हिडीओ कोर्सेस विकत घेणे या गोष्टींमार्फत तुम्ही ज्ञान मिळवू शकता, ऑनलाईन गोष्टी शिकायला भरपूर कमी खर्च येतो आणि कोचिंग क्लासेस च्या तुलनेत कमीत कमी खर्चात तुम्ही शिकू शकता.

येणाऱ्या नवीन वर्षात एक निश्चय करा, Self Education, Self Development कडे भर द्या, इतरांपेक्षा काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करा, लक्षात ठेवा आज जगात ज्या लोकांची नाव आदराने घेतली जातात त्या मागचं कारण एकच असतं की त्यांनी इतरांपेक्षा काहीतरी वेगळं, अदभूत असं केलं आहे जे इतर कोणी करण्याचा प्रयत्न अथवा विचार सुद्धा केला नाही, जेवढ्या जास्त नवीन गोष्टी तुम्ही शिकता तेवढं तुम्ही स्वतःमध्ये सुधारणा करत असता, स्वतःची किंमत वाढवत असता, दिवसातून २ तास जरी तुम्ही Self Learning साठी दिले तरी तुम्ही भरपूर नवीन गोष्टी शिकू शकता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *